महत्वाच्या बातम्या

 भंडारा जिल्ह्यात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन जनजागृती मोहीम सुरू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार भंडारा जिल्ह्यातील ६० - तुमसर, ६१ -भंडारा व ६२ -साकोली या विधानसभा मतदार संघात EVM व VVPAT मशीनचे मतदारांना प्रशिक्षण, प्रसार, प्रसिध्दी व जनजागृती करण्याकरिता EVM प्रात्यक्षिक केंद्र आणि मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅन (MDV) स्थापित करण्यात आली आहेत.  

याचा शुभारंभ काल १८ डिसेंबर २०२३ रोजी अपर जिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांनी मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅन ला हिरवी झेंडी दाखवून केला. प्रत्येक मतदार संघात दोन मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅन व्दारे EVM बाबत जनजागृती जिल्हयातील प्रत्येक मतदान केंद्र इमारतीचे ठिकाणी २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत करण्याचे नियोजित आहे. तसेच EVM प्रात्यक्षिक केन्द्र प्रत्येक उपविभागीय अधिकारी कार्यालयात मतदारांना प्रात्यक्षिकासाठी उपलब्ध करण्यात आले आहे.

मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅन व्दारे (MDV) जनजागृती मोहिमेचे वेळापत्रक विधानसभा मतदार संघ निहाय तयार करून मतदारांत जागरुता निर्माण करण्याकरिता भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्राच्या क्षेत्रात / गावातील शहरातील मुख्य चौक, बाजार, शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींची कार्यालये, सभांच्या ठिकाणी इत्यादी मोक्याच्या ठिकाणी मोबाइल व्हॅन व्दारे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनची प्रात्यक्षिके दाखविण्यासाठी व मतदारांना अभिरुप मतदान करण्यासाठी या कार्यालयामार्फत १८ डिसेंबर २०२३ ते २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत ईव्हीएम जनजागृती मोहिम राबविण्यात येणार असून याचा लाभ जिल्हयातील मतदारांनी घ्यावा असा संदेश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर व जिल्हा निवडणूक अधिकारी भंडारा यांनी दिला आहे.    





  Print






News - Bhandara




Related Photos