आता शिक्षकांचे वेतन होणार १ तारखेलाच!


- जुलै चे वेतन ५ ऑगस्टला तर ऑगस्ट चे वेतन १ सप्टेंबर ला  करण्याचे शासनाचे आदेश  
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  नंदोरी : 
शासन निर्देशित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन एक तारखेला करण्याचे आदेश असले तरी शिक्षकाचे वेतनास विलंबच होत असल्याने  जुलै चे वेतन ५ ऑगस्टला तर ऑगस्ट चे वेतन १ सप्टेंबर ला  करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत.  तसा आदेश नुकताच निगर्मित करण्यात आला आहे आणि यापुढे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याचे एक तारखेलाच करण्यात यावे अशा स्पष्ट सुचना दिल्या असुन वेतनास विलंब झाल्यास संबधीत अधिकारी, यंत्रणेविरूद्ध कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सुचीत केले आहे. 
  दरम्यान १२ ऑगस्ट  रोजी मुस्लिम बांधवांच्या पवित्र बकरीद सणाच्या  निमित्ताने  जुलै  चे वेतन ५ ऑगस्ट पर्यंत करण्यात यावे याबाबत संबधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले असल्याने व यापुढे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याचे एक तारखेलाच होणार असल्याने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांत आनंद व्यक्त होत आहे . 



  Print






News - Wardha | Posted : 2019-08-03






Related Photos