मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनदेश यात्रा भंडारा जिल्ह्यात दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा :
महाजनादेश यात्रेनिमित्त आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भंडारा येथे आगमन झाले असता जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 
मुख्यमंत्री यांचे समवेत नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भंडारा-गोंदियाचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके होते. शिवाजी क्रीडा संकुल येथे जिल्हाधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, तहसिलदार अक्षय पोयाम व नगरपालिकेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यावेळी उपस्थित होते.  Print


News - Bhandara | Posted : 2019-08-03


Related Photos