मणक्याच्या आजाराने ग्रस्त १० रुग्णांवर शस्त्रक्रिया


-  मा दंतेश्वरी दवाखान्यात शिबीर : स्पाईन फाउंडेशनचे सहकार्य
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली
: सर्च येथील मा दंतेश्वरी धर्मादाय दवाखान्यात नुकतेच मणक्याच्या आजारावर शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. मणक्याच्या आजाराने ग्रस्त १० रुग्णांवर शस्त्रक्रिया झाल्या. स्पाईन फाउंडेशन, मुंबई येथील डॉक्टरांच्या चमूने या शस्त्रक्रिया केल्या.
श्रमाची कामे करताना पाठीवर, कमरेवर आणि मणक्यावर ताण पडतो. हा ताण वाढत गेल्याने मणक्याचे आजार उद्भवतात. सर्च मध्ये उपचारासाठी आलेल्या अनेक रुग्णांना मणक्याच्या दुखण्याचा त्रास असल्याचे वारंवार निदर्शनास येते. त्यामुळे या आजाराने त्रस्त रुग्णांसाठी काहीच दिवसांपूर्वी सर्च मध्ये शिबीर घेऊन मणक्याच्या आजारांची तपासणी करण्यात आली. या शिबिरातील तसेच सर्च मध्ये इतर उपचारासाठी आलेल्या १० रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज लक्षात घेत सर्च मध्ये मणक्याच्या आजारावर शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले.
मुंबई येथील स्पाईन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर भोजराज यांच्या मार्गदर्शनात डॉ. रघुप्रसाद वर्मा, डॉ. शीतल मोहिते, डॉ. समीर कालकोटवार, डॉ. प्रेमिक नगद, डॉ. जयेश भानुशाली यांनी या शस्त्रक्रिया केल्या. डॉ. जयश्री कोरे, डॉ. सोनल रंभाड आणि डॉ. शिल्पा मलिक यांनी भूलतज्ञ म्हणून भूमिका सांभाळली. चंद्रपूर आणि नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिबिरासाठी सहकार्य केले. पुण्याच्या काशीबाई नवले कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी फ़िजिओथेरपिस्टची भूमिका सांभाळली. रुग्णालयाच्या संचालक डॉ. राणी बंग यांच्या मार्गदर्शनात डॉ. चैतन्य मलिक, डॉ. वैभव तातावार, डॉ. दत्ता भलावी, डॉ. मयुरी भलावी, . अभिषेक पाटील, डॉ. कोमल भट यांनी शिबिराचे नियोजन केले.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-03


Related Photos