भामरागडला पुराने चहुबाजूंनी वेढले, दुकाने, घरे पाण्यात


- नागरीकांना करावा लागतोय बोटीचा वापर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
मनिष येमुलवार / भामरागड :
काल २ ऑगस्टपासून भामरागडला पुन्हा पुराने चहुबाजूंनी वेढले असून नागरीकांच्या घरात तसेच दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. नागरीकांना बोटीच्या सहाय्याने घराकडे ये - जा करावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 
काल २ ऑगस्ट रोजी दुपारी पर्लकोटा नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक बंद झाली होती. आरेवाडा, लाहेरी मार्गसुध्दा बंद पडले. यामुळे चारही बाजूने भामरागड चे मार्ग बंद झाले आहेत. रात्री हळू - हळू पाण्यात वाढ होउन जवळपास ४० नागरीकांच्या घरात पाणी शिरले. १५ ते १६ दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. प्रशासनाच्या सतर्कतेच्या इशाऱ्यानंतर नागरीकांनी घरातील तसेच दुकानातील साहित्य सुरक्षित स्थळी हलविल्याने कोणतेही नुकसान झाले नाही. सध्यातरी पाण्याची पातळी वाढत आहे. यामुळे नागरीकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-03


Related Photos