मैत्रेय कंपनीतील गुंतवणूकदारांनी माहिती सादर करावी


- पोलिस विभागाचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
ठेवीदारांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम गोळा केल्यानंतर शाखा बंद करून पसार झाल्यामुळे हजारो ठेवीदारांची रक्कम अडकून पडली आहे. याबाबत गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल असून गुन्ह्याचा तपास सायबर पोलिस ठाणे करीत आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी आपली माहिती सादर करावी, असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.
गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक ए.टी. राठोड करीत आहेत. गुंतवणूकदारांनी एजंटच्या मार्फतीने नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, ई - मेल आयडी, पॅन कार्ड क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, बॅंक खाते क्रमांक आयएफएससी कोड, पाॅलिसी बाॅंड क्रमांक, गुतवणूकदारांची रक्कम, मुदतीनंतर मिळणारी रक्कम आदी माहिती सायबर पोलिस ठाण्यात सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-02


Related Photos