‘निर्माण’ चे ३ ऑगस्ट पासून नवव्या सत्राचे दुसरे शिबीर , ५५ वैद्यकीय विद्यार्थ्यांचा सहभाग


- सामाजिक क्षेत्रात युवा नेतृत्व तयार करण्यासाठीचा एक प्रयोग ‘निर्माण’
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
माझ्या शिक्षणाचा मूळ हेतू काय ? माझ्यातील कौशल्याचा समाजातील आव्हाने व प्रश्न सोडवण्यासाठी उपयोग करता येईल का  ? मी नक्की काय हेतु घेऊन जन्माला आलो,  समाजातील प्रश्नांवर काही करावे असे वाटते पण नक्की काय आणि कसे करावे असे अनेक प्रश्न युवकांना भेडसावतात. अशा प्रश्नांची उत्तरे शोधणाऱ्या आणि फक्त पैसे कमवणे हे आयुष्याचं ध्येय न मानता समाजातील प्रश्न आव्हान म्हणून स्वीकारण्यासाठी ५५ ‘निर्माणी’ वैद्यकीय युवा सज्ज झाले आहे.
  निर्माण च्या नवव्या सत्राचे दुसरे शिबीर ३ ते ११ ऑगस्ट या कालावधीत धानोरा तालुक्यातील सर्च मध्ये होत आहे. भारतभरातील वैद्यकीय महाविद्यालयातील ५५ युवा यात सहभागी होणारा आहेत.  आरोग्य क्षेत्रातील समस्यांबद्दल, त्यांच्या जटीलतेबद्दल कुतूहल आणि बौद्धिक समज युवांमध्ये निर्माण करणे, आरोग्य क्षेत्रात सामाजिक योगदान देण्यासाठीचे वेगवेगळे मार्ग समजून घेणे, वेगवेगळ्या रोल मॉडल्सच्या प्रवासातून सामाजिक कृती करण्याचे धाडस निर्माण करणे, आरोग्य क्षेत्राच्या परिघाबाहेरील सामाजिक-आर्थिक-राजकीय वास्तवाची ओळख करून घेणे आणि या विविध टप्प्यांमधून जाताना ‘मी जीवनात आता काय करू’ या निर्णयापर्यंत शिबिरार्थींना पोहचवणे हा शिबिराचा मुख्य उद्देश आहे.
शिबिरात टाटा ट्रस्टचे लक्ष्मण सेतुरामन आणि नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन ट्राबल हेल्थ, जबलपूर येथील वरिष्ठ संशोधक डॉ. तपस चकमा युवांशी संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर नवजात मृत्यू रोखण्यासाठी सर्चने केलेल्या कामाविषयी पद्मश्री डॉ. अभय बंग मार्गदर्शन करणार आहेत. असंसर्गजण्य रोग आणि सार्वजनिक स्थरांवरील लकव्या नियंत्रणासाठीचे सर्चने केलेल्या प्रयोगाविषयी डॉ. योगेश कालकोंडे,  अर्थव्यवस्था, बाजारीकरण आणि उपभोक्तावाद याविषयी सुनील चव्हाण युवांशी संवाद साधतील.  गडचिरोलीतील मानसिक आरोग्य आणि स्वतःचा प्रवास मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आरती बंग उलगडणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील देलनवाडी, रांगी, पेंढरी या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर काम करत असलेले डॉ. मृदुला भोईर, डॉ. हर्षा नन्नावरे आणि डॉ. अभिषेक मारबडे या निर्माणी डॉक्टरांना भेटून त्यांचा अनुभव जाणून घेत प्राथमिक आरोग्य केंद्रांवर काम समजून घेण्याचा प्रयत्न शिबिरार्थी करणार आहेत.

निर्माण मध्ये सहभागी व्हा  

आजपर्यंत निर्माणच्या ९ बॅचेस झाल्या आहेत आणि निर्माणची १० वी बॅच लवकरच सुरु होत आहे. निर्माण बॅचसाठी निवड प्रक्रिया दोन टप्यात असते, पहिला टप्पा प्रवेश अर्ज आणि दुसरा मुलाखत. संपूर्ण महाराष्टातुन फक्त २०० जणांची निवड होईल. १०व्या बॅचमध्ये सहभागी होण्यासाठी भरावयाचे निवड अर्ज http://nirman.mkcl.org या संकेत स्थळावरील ‘डाउनलोड’ मध्ये उपलब्ध आहेत. 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-02


Related Photos