महत्वाच्या बातम्या

 सिंदेवाही : शेतमालाचे नुकसान करणाऱ्या रानडुकरांचा बंदोबस्त करा अन्यथा मारण्याची परवानगी द्या 


- निवेदनातून शेतकऱ्यांची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुका हा धान उत्पादक तालुका आहे. या तालुक्यात कोणताही मोठा उद्योग नसल्याने शेती उत्पन्नावर शेतकऱ्यांना अवलंबून रहावे लागते. धानाचे उत्पन्न चार ते पाच महीण्यात पूर्ण होते. त्यामुळे शेतात पुन्हा उत्पन्न घेण्यासाठी तूर, चना, गहू सोबतच धान हे उत्पन्न घेतले जाते. 

जंगलाशेजारील व गावाशेजारील शेतात रानडुकरांचा मोठ्या प्रमाणात हौदास सुरु असून शेतात असलेल्या पिकाची प्रचंड नासधूस करीत आहेत. शेतात वन्यप्राण्यांच्या धुमाकूळामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. कारण पिकासोबत जीवितहानी होण्याची भिती असते. त्यामुळे या रानडुकरांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याची दखल घेऊन त्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा रानडुकरांना मारण्यासाठी शेतकऱ्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी सिंदेवाही तालुक्यातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बनमंत्री व विरोधी पक्षनेता यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. 

निवेदन देतांना संदीप डोंगरवार, नेताजी गहाणे, बालाजी लेंझे, युवराज पर्वते, मंगेश गहाणे, विजय झोडे, प्रवीण लोखंडे व इतर शेतकरी उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos