भामरागडला पुन्हा पुराने वेढले , अखंडित पावसामुळे जलस्तर वाढतेय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड :   
३१ जुलै आणि १ ऑगस्ट रोजी भामरागड - आलापल्ली मार्ग सुरळीत झाला होता. मात्र  काल रात्रीपासून पुन्हा मुसळधार पाऊस सुरु झाल्याने पर्लकोटा नदीला पूर आला असून, भामरागड ला पुन्हा पुराने वेधले आहे.   भामरागडचा जगाशी संपर्क तुटण्याची पाच दिवसांतील ही दुसरी वेळ आहे. भामरागड मार्गावरील कुडकेली नाल्याच्या पुलावर सुद्धा पूर आहे.  यामुळे भामरागड - हेमलकसा हा मार्गसुद्धा बंद आहे. 
मुसळधार पावसामुळे २९ जुलैला पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी चढल्याने भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला होता. ३१ जुलैच्या संध्याकाळी पुलावरील पाणी ओसरल्याने रहदारी सुरु झाली होती. दरम्यान काल १ ऑगस्ट पासून   पुन्हा मुसळधार पाऊस पडल्याने आज दुपारी १२ वाजतापासून पर्लकोटा नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागले. त्यामुळे पुन्हा रहदारी बंद झाली आहे.  तालुक्यातील शंभर गावांचा संपर्क तुटला आहे.  पावसाचा जोर कायम असून पर्लकोटा नदीवरील पाण्याची पातळी वाढत आहे. यामुळे सायंकाळपर्यँत भामरागड शहरात पाणी शिरण्याची शक्यता आहे. २९ जुलै रोजी आलेल्या पुरामुळे शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होऊ शकते.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-02


Related Photos