असरअल्ली - सोमनूर मार्गावरील मुत्तापूर नाल्यावर पडले भगदाड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / सिरोंचा :
गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सोमनूरकडे जाणाऱ्या असरअल्ली - सोमनूर मार्गावरील मुत्तापूर नाल्याच्या पुलावर भल्ला मोठा भगदाड पडला आहे. यामुळे अपघाताचा धोका बळावला आहे.
असरअल्ली सोमनूर मार्गावर मुत्तापूर नाला आहे. या नाल्यावर सिमेंटचा छोटा पुल बांधण्यात आला आहे. मात्र या पुलाला सध्या सुरू असलेल्या पावसामुळे भल्ला मोठा भगदाड पडला आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरीकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. नाल्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. यामुळे हा भगदाड आणखी मोठा होउन पुल पूर्णतः खचण्याचा धोका आहे. काही नागरीकांनी या भगदाडाच्या ठिकाणी लाकडे टाकून ठेवली आहे. यामुळे नागरीकांना भगदाड निदर्शनास तरी येत आहे. रात्रीच्या वेळी या नाल्यावरून प्रवास करताना नागरीकांच्या जिवाला धोका होउ शकतो. यामुळे हा भगदाड तातडीने बुजविण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-02


Related Photos