पत्रकार रवीश कुमार यांचा 'रेमन मॅगसेसे' पुरस्काराने गौरव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / दिल्ली :
देशातील जनसामान्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडणारे पत्रकार रवीश कुमार यांना सर्वोच्च रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. रवीश कुमार यांच्यासह म्यानमारचे को स्वे विन, थायलँडच्या अंगखाना नीलापजीत आणि फिलिपिन्सचे रेमुंडो पुजांते कैयाब हे यंदा पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
जनसामान्यांना भेडसावणारे प्रश्न सातत्याने एनडीटीव्हीच्या 'प्राइम टाइम' या कार्यक्रमाद्वारे रवीश मांडतात. वंचितांचे, सोशितांचे , पीडितांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांना जाब विचारण्याचे काम रवीश आजही धडाडीनं करत आहेत. ज्यांचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोहचू शकत नाही अशा अनेकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम रवीश गेली अनेक वर्ष निर्भीडपणे करत असल्यानं त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती पुरस्कार संस्थेनं दिली आहे. विशेष म्हणजे यंदा हा पुरस्कार मिळवणारे ते एकमेव भारतीय आहेत. पत्रकारिता क्षेत्रात याआधी ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ, अरुण शौरी मॅगेसेसे पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. 
  Print


News - Rajy | Posted : 2019-08-02


Related Photos