नक्षल्यांच्या बंदमुळे दर्रेकसा परिसराला संचार बंदीचे स्वरुप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : 
पिपल्स लिब्रेशन गुरीला आर्मी तथा जनवादी क्रांतीकारी माओवादी संघटनेच्या वतीने २८ जुलै ते ३ ऑगस्टपर्यंत शहीद सप्ताह साजरा करण्यात येत आहे. नक्षल सप्ताहाच्या धास्तीपोटी सालेकसा तालुक्यातील संवेदनशील दर्रेकसा परिसराला संचार बंदीचे स्वरुप आले आहे. परिसरातील अनेक व्यापारी आपले प्रतिष्ठाने बंद ठेवत आहेत तर दुसरीकडे नक्षल सप्ताहा घेऊन एस.टी. महामंडळाकडूनही नक्षल क्षेत्रातील बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.  त्यामुळे रस्त्यांवरही सुकसुकाट पाहावयास मिळत आहे.
माओवादी संघटनेच्या वतीने दरवर्षी जुलै व ऑगस्ट महिन्यात नक्षल शहीद सप्ताह साजरा केला जातो. गोंदिया जिल्हात नक्षली गेल्या अनेक वर्षापासून सक्रीय नसले तरी पोलिसांचा सर्च मोहिमेमध्ये अनेक ठिकाणी नक्षल्यांनी पेरलेले जीवंत स्फोटक पदार्थ हस्तगत करण्यात आले. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात नक्षल्यांचा वावर असल्याचेही समोर आले आहे.  त्यातच नक्षल सप्ताहा सुरू असल्यामुळे तालुक्यातील अतिसंवेदनशील क्षेत्रामध्ये आजही भितीचे वातावरण आहे. नक्षल सप्ताहामुळे दर्रेकसा व परिसरातील  गावांमध्ये संचारबंदीचे स्वरुप पाहावयास मिळत आहे.   Print


News - Gondia | Posted : 2019-08-01


Related Photos