महापरीक्षा पोर्टल बंद करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक


- बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे 
वृत्तसंस्था / बीड : 
महापरीक्षा  पोर्टल द्वारे केली जाणारी नोकरभरती घोटळेबाजांचं कुरण झालं आहे. प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या मुलांचं नुकसान होत आहे. तसेच  तलाठीभरती, वनरक्षकभरतीमध्ये मोठ्य़ा प्रमाणत घोळ  झाल्याचा  आरोप करीत महापरीक्षा पोर्टल बंद करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन केले. 
 पैसे घेऊन नोकरीला डमी उमेदवार बसवून बोगसगिरी केली जात आहे , असं आंदोलक विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं. म्हणूनच ‘महापरीक्षा ऑनलाईन पोर्टल’वरील नोकरभरती बंद करून OMR सीटद्वारे MPSC सारखी लेखी परीक्षा घ्यावी अशी मागणी या विद्यार्थ्यांनी  केली आहे.   परिस्थिती बिकट असून आम्ही अर्ध्या पोटाने राहून अभ्यास करत आहोत पण भरती  मधील गोंधळामुळे आमच्यावर अन्याय होत आहे  हे सांगताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत पाणी आले होते. या मोर्चात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. येणाऱ्या निवडणुकीत विद्यार्थीकेंद्री धोरण राबवून नोकरभरतीचा मार्ग मोकळा करावा अन्यथा सर्व विद्यार्थी मतदानावर बहिष्कार टाकू, असा इशारा दिला.  Print


News - Rajy | Posted : 2019-08-01


Related Photos