भिंत कोसळून जखमी झालेल्या गंगा जमनातील दोन महिलांची प्रकृती चिंताजनक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  नागपूर : 
मंगळवारी रात्री  गंगा जमनातील टिनाच्या झोपड्यांवर  इमारतीची भींत कोसळल्याने जखमी झालेल्या चार महिलांपैकी दोघींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. जखमी झालेली महिला व तीन तरुणींवर विविध तीन खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
 राधा (४०), प्रियंका (२६), पुनम (२५) व साक्षी (२४) अशी जखमींची नावे आहेत. मंगळवारी रात्री गंगा-जमनातील रेवतकर यांच्या मालकीच्या इमारतीची भिंत बाजूलाच असलेल्या टिनाच्या झोपड्यांवर कोसळली. चौघी भिंतीखाली दबून जखमी झाल्या. परिसरातील महिला व नागरिकांनी मदतीसाठी आरडाओरड करायला सुरुवात केली. माहिती मिळताच लकडगंज पोलिस व महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे जवान तेथे पोहोचले. जखमींना तातडीने मलब्यातून बाहेर काढून खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जखमींपैकी दोघींवर बुधवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेत एका श्वानाचा मृत्यू  झाला आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2019-08-01


Related Photos