भामरागड मधील पूर ओसरला, पर्लकोटाच्या पुलावरून वाहतूक सुरु


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : 
मागील  चार दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार  पावसामुळे भामरागड तालुक्याचा जिल्ह्याशी संपर्क तुटला होता. भामरागड मध्ये पूरपरिस्थिती होती. मात्र  आज ३१ जुलै रोजी दुपारी पाऊस थांबल्यानंतर भामरागड मधील परिस्थिती  पूर्वपदावर येत आहे.   
भामरागड जवळील   पर्लकोटा नदीच्या पुलावरील पाणी ओसरले असून  संध्याकाळपासून वाहतूक सुरळीत झाली आहे. चार दिवसांपासून खंडित असलेला      वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला . पुरामुळे तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. भ्रमणध्वनी सेवा बंद होती. आरोग्याच्या सोयीसाठी नागरिकांचे हाल झाले. मात्र पूर ओसरल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत आहे. दरम्यान गोसेखुर्द धरणाचे १७ दरवाजे अर्धामीटरने उघडण्यात आले असून, त्यातून १७९४ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे वैनगंगा व उपनद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. 

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-31


Related Photos