ईव्हीएम विरोधी मोहिम तीव्र करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली ममता बॅनर्जी यांची भेट


वृत्तसंस्था / कोलकत्ता : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बुधवारी कोलकात्यात  मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आहे. कोलकाता राज्याच्या सचिवालयात त्यांची भेट झाली.  ईव्हीएम विरोधी मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या देशातील विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.  
  भेटीमध्ये निवडणूक सुधारणा, मतपत्रिकेद्वारे मतदान व राजकीय परिस्थिती यासारख्या विषयावर चर्चा झाली. तृणमूल काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की, ममता बॅनर्जी यांना ठाकरे यांनी दूरध्वनी केला होता. त्यांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी त्यांना भेटण्याची वेळ दिली. लवकरच मनेस ईव्हीएमविरोधात मैदानात उतरणार आहेत. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपर आणा अशी मागणी राज ठाकरेंनी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर जे आंदोलन होणार आहे त्याची तयारी आता राज ठाकरे यांनी सुरु  केल्याचे दिसून येत  आहे.   Print


News - World | Posted : 2019-07-31


Related Photos