विद्यार्थिनीवर हल्ला करणाऱ्या अस्वलीला पकडण्यात वनविभागाला यश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मुल
: काल  ३० जुलै रोजी  कर्मविर महाविद्यालयातील स्वछतागृहात दडून बसलेल्या अस्वलीने विद्यार्थिनीवर हल्ला केला होता. यामध्ये विद्यार्थिनी निशा नारायण सोनुले ही जखमी झाली होती. यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. वनविभागाने या अस्वलीला तातडीने पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली. अखेर अस्वल पकडण्यात वनविभागाला यश आले आहे.   
वन्यजीव प्रेमी उमेशसिंह झिरे यांना सकाळी ६.४५  दरम्यान जि. प. शिक्षक विवेक कामीडवार यांनी वार्ड क्रमांक १६ मधील रिकाम्या जागेवरील झुडपामधे
आस्वल असल्याची माहीती दीली.  स्थानीक वनरक्षक मरस्कोले यांना घेउन पाहणी केली असता   अस्वल उपजिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहा जवळ झुडपामधे लपुन बसल्याचे आढळले. लगेच उमेशसिंह झिरे यांनी ही माहीती विभागीय वनाधिकारी सोनकुसरे  यांना दिली. त्यांच्या आदेशावरुन त्या आस्वलीला पकडुन नेन्याचा निर्णय घेण्यात आला. अतीशीघ्र कृती दल आणी वनविभागाचे कर्मचारी व वन्यजीव प्रेमी यांच्या मदतीने अस्वलाला गुंगीचे  इंजेक्शन देऊन सुरक्षीतपणे पकडण्यात आले .  वन्य प्राणी उपचार केंद्र चंद्रपुरला हलवीन्यात आले . या मोहीमेदरम्यान विभागीय वनाधिकारी सोनकुसरे  , वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरकर  , चौहान  , वसावे  , प्राणी मित्र उमेशसिंह झिरे, तन्मयसिंह झिरे, क्षेत्रसहाय्यक खनके  ,शेन्डे  , डॉ. रविकांत खोब्रागडे, शुटर अजय मराठे,  बिट वनरक्षक मरस्कोले, गुरनुले, गेडाम, RRU टीम चंद्रपुर, RRT टीम ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे सहभागी होते.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-07-31


Related Photos