महेंद्रसिंह धोनी आजपासून जम्मू काश्मीरमध्ये : १५ दिवस भारतीय सैन्यात सेवा बजावणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि खेळाडू धोनी हा आजपासून जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्यात सेवा बजावणार आहे. लेफ्टनंट कर्नल हि पदवी मिळालेला महेंद्रसिंग धोनी हा पुढील १५ दिवस भारतीय सैन्याबरोबर राहणार असून लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंग धोनी हा ३१ जुलै ते १५ ऑगस्ट २०१९ पर्यंत या बटालियनमध्ये सामील होणार आहे.
बटालियनमध्ये सामील झाल्यानंतर धोनी गार्ड, पोस्‍ट ड्यूटी, पेट्रोलिंग यांसारखी कामे करणार असून तो सैनिकांबरोबरच राहणार असून त्यांच्याबरोबर काम देखील करणार आहे. तो आज काश्मीरमधील टेरिटोरियल आर्मीच्या १०६ पॅराशूट बटालियनमध्ये सामील होणार आहे.
महेंद्रसिंग धोनी याची पोस्टिंग दक्षिण काश्मीरमधील अवंतिपुरा मध्ये करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून या ठिकाणी दहशहतवादी कारवाया वाढल्याने या जागेला महत्व प्राप्त झाले आहे. धोनीने बीसीसीआयला दोन महिन्यांची विश्रांती मागितली असून यादरम्यान तो भारतीय सैन्याबरोबर आपला काळ व्यतीत करणार आहे. त्यामुळे त्याने विंडीजच्या दौऱ्यातून देखील विश्रांती घेतली होती. भारतीय सैन्याबरोबर राहण्यासाठी धोनीने सैन्यप्रमुख बिपीन रावत यांच्याकडे परवानगी मागितली होती. त्यांनी परवानगी दिल्यानंतर धोनी हा सैन्याबरोबर गस्त घालणार असल्याचे नक्की झाले. मात्र इतका मोठा कार्यकाळ, त्याचबरोबर ट्रेनिंग आणि प्रतिकूल परिस्थितीत तो कशा प्रकारे राहतो यामुळे सगळ्यांचे लक्ष धोनीकडे लागले आहे.
दरम्यान, धोनीचे सैन्याबद्दलचे प्रेम काही नवीन नाही. एका मुलाखतीत देखील त्याने आपल्याला सैन्यात भरती व्हायचे होते असे सांगितले होते. मात्र नशिबात वेगळेच लिहिले असल्याने धोनीने क्रिकेट रसिकांचे मोठ्या प्रमाणावर मनोरंजन केले. धोनीला २०१५ मध्ये सैन्याने या मानद पदवीने सन्मानित केले होते.   Print


News - World | Posted : 2019-07-31


Related Photos