काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चार आमदारांचा शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश


वृत्तसंस्था / मुंबई :  आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चार आमदारांनी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आज औपचारिकरित्या भाजपमध्ये प्रवेश केला. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्वांचे स्वागत केले. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये सातारा-जावळीचे शिवेंद्रराजे भोसले, ऐरोलीचे संदीप नाईक, अकोलेचे वैभव पिचड व मुंबईतील वडाळ्याचे कालिदास कोळंबकर यांचा समावेश आहे. 
मुंबईतील गरवारे क्लब हाऊसमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हेही यावेळी उपस्थित होते. 'हे सर्व नेते व आमदार स्वेच्छेने भाजपमध्ये आले आहेत. त्यांच्यावर कोणतीही जोरजबरदस्ती करण्यात आलेली नाही,' असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं. गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाला कडाडून विरोध करणाऱ्या बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे या देखील यावेळी उपस्थित होत्या.    Print


News - Rajy | Posted : 2019-07-31


Related Photos