न.प. शाळेच्या विद्यार्थ्यांना नगराध्यक्षा योगिताताई पिपरे यांच्याहस्ते गणवेश, स्कूल बॅग व साहित्याचे वितरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
स्थानिक नगर परिषदेच्या वतीने नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश, बुट, मोजे, स्कूल बॅगचे वाटप केले जाणार आहे. 
या अंतर्गत राजीव गांधी न.प. प्राथमिक शाळा हनुमान वार्ड,  संत जगनाडे महाराज प्राथमिक शाळा लांजेडा, महात्मा गांधी न.प. प्राथमिक शाळा फुले वार्ड या शाळांमध्ये   नगराध्यक्षा योगिताताई पिपरे यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना गणवेश, बुट, स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक प्रमोदजी पिपरे, प्रमुख अतिथी म्हणून मुख्याधिकारी संजय ओव्हळ, पाणीपुरवठा सभापती मुक्तेश्वर काटवे, नगरसेविका वैष्णवीताई नैताम, मंजुषाताई आखाडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक, नागरीक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-30


Related Photos