पोटेगाव हद्दीत पोलिस - नक्षल चकमक, एक नक्षली ठार झाल्याची माहिती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
पोटेगाव जंगल परिसरात पोलिस आणि नक्षल्यांमध्ये चकमक उडाली असून एक नक्षली ठार झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मृत नक्षल्याचा मृतदेह पोलिस पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती आहे. सदर घटना आज २९ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.
पोटेगाव जंगल परिसरात नक्षलविरोधी शोधमोहिम राबविताना चकमक उडाली. या चकमकीनंतर नक्षली जंगलात पसार झाले. मात्र एका नक्षल्याचा मृतदेह हाती लागल्याची माहिती आहे. या चकमकीत आणखी काही नक्षली ठार अथवा जखमी झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.   

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-29


Related Photos