विद्युत तारांच्या स्पर्शाने बिबट व वानराचा मृत्यू , एकलपूर जवळील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : 
तालुक्यातील एकलपूर जवळील एका शेतातील झाडावर काल २८ जुलै रोजी  रात्री बिबट व वानर यांच्या झटापटीत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने दोघांचाही मृत्यू झाल्याची घटना घडली. बिबट्याने आंब्याच्या झाडावर बसलेल्या वानरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता वानराने झाडालगत असलेल्या विदयुत तारेवर उडी मारली .त्यापाठोपाठ बिबट्यानेही उडी मारल्याने झटापटीत दोघाचाही विदयुत तारेला स्पर्श झाला .यात दोघांचाही मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला .घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले . वनविभागाचे अधिकारी डी.एफ .ओ . भिवरेकर , सहाय्यक वन संरक्षक कांबळे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला .बिबट व वानराचा मृतदेह वडसा वनविभागामध्ये आणण्यात आला आहे .पुढील तपास वनविभागाचे अधिकारी करीत आहेत. 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-29


Related Photos