महत्वाच्या बातम्या

 मन आणि मेंदू यांचा वापर करून आपण माणूस झालो पाहिजे : डॉ. संजय शेंडे 


- लेखक व सामाजिक चळवळीचे अभ्यासक नागपूर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : जगातील मूठभर लोक संपूर्ण विश्वातील पर्यावरण ओरबडायला तयार झाले आहे. म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आता देश वाचवायचा असेल तर कुणाचा द्वेष करण्यापेक्षा प्रेम करा, आजूबाजूच्या समस्या जाणून घ्या, बुद्धाची करुणा समाजाप्रती बाळगा, प्रचंड कष्ट घेऊन भारतातील प्रत्येक नागरिकाच्या उदात्तेचा स्वप्न पाहणाऱ्या संविधान कर्त्याच्या स्वप्नातील भारत जाणून घेण्यासाठी पुस्तकाशी मैत्री करा, अभ्यास करा, टीव्ही, मोबाईल,कपडे खरेदीची हावरट वृत्त्ती होती सोडून पुस्तके खरेदी करा. पुस्तके तुम्हाला माणूस होण्याकडे घेऊन जाते. असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष वार्षिक शिबिरात प्रमुख अतिथी म्हणून संजय शेंडे बोलत होते. श्री ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव जिल्हा चंद्रपूरच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष वार्षिक शिबिराचे  उद्घाटन मिनघरी येथे संपन्न झाले.

उद्घाटक म्हणून नागपूर येथील शिवाजी सायन्स महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. चंद्रशेखर चांदेकर हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून लेखक व सामाजिक चळवळीचे अभ्यासक डॉ. संजय शेंडे यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

नागपूर येथील प्रगतिशील शेतकरी प्रकाश घोंगे पाटील तसेच महाराष्ट्र एम्पलोय फोरमचे महासंघटक डी.डी. गोंडाने यांनीही उपस्थिती लावली. उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश बाकरे यांनी भूषविले. 

विशेष बार्शी शिबिराच्या आयोजनामधील पार्श्वभूमी विशद करीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या नियमित उपक्रमाचे वर्ष २०२३- २४ मधील रचनात्मक कार्याचा परिचय कार्यक्रमाधिकारी गजानन कोर्तलवार यांनी करून दिला. बीए. तृतीय वर्षाचे विद्यार्थिनी रूपाली डोंगरवार हिने पूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 

सह कार्यक्रमाधिकारी मिलिंद फुलझेले यांनी आभार मानले. यावेळी मौजा मीनघरी येतील ग्रामस्थ तसेच महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तथा महिला सह कार्यक्रमाधिकारी प्रा. उषा वडपल्लीवर, प्रा. वर्षा कोसमशिले उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos