चंद्रपूर जि.प. चा माजी सदस्य व शिक्षक असलेल्या बापाकडून मुलींवर अत्याचार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर
: जिल्हा परिषदेचा माजी सदस्य असलेला व सध्या शिक्षक पदावर कार्यरत असलेल्या बापाने स्वतःच्याच अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची नात्याला काळीमा फासणारी घटना नागभिड तालुक्यात घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
आरोपी हा चंद्रपूर जिल्हा परिषदेचा माजी सदस्य आहे. सध्या तो नवरगाव येथील शाळेत शिक्षक पदावर कार्यरत आहे. त्याचे पत्नीसोबत भांडण झाल्यामुळे पत्नी त्याच्यासोबत राहत नाही. आरोपीला १४ आणि १७ वर्ष वयाच्या दोन मुली आहेत. या मुलींवर तो मागील काही दिवसांपासून अत्याचार करीत होता. याबाबत मुलींनी आपल्या मामाला माहिती दिल्यानंतर मामाने दोन्ही मुलींना घेवून नागभिड पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी लागलीच आरोपीला अटक केली आहे.पुढील तपास नागभिड पोलिस करीत आहेत. या  धक्कादायक घटनेमुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे.

 
  Print


News - Chandrapur | Posted : 2019-07-29


Related Photos