सुनेने मारहाण करुन घराबाहेर काढल्याने ७५ वर्षीय सासूची विष प्राशन करून आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  नागपूर :
सुनेने मारहाण करुन घराबाहेर काढल्याने ७५ वर्षीय सासूने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना हुडकेश्वरमधील श्रीहरीनगर येथे उघडकीस आली. 
सत्यभामा देवराव कामडी, असे मृत सासूचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्यभामा यांचे पती निवृत्त शिक्षक असून, त्यांना सुरेश नावाचा मुलगा आहे. २००४ मध्ये सुरेश यांचे स्मिता यांच्यासोबत लग्न झाले. लग्नानंतर सासू-सुनेचे नेहमी वाद होत होते. त्यामुळे सुरेश यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. सुरेश व स्मिता वेगळे राहायला लागले. यादरम्यान दोघांमध्येही वाद व्हायला लागले. हा वाद पोलिसांत पोहोचला. पोलिसांच्या मध्यस्थीने चौघेही एकत्र राहु लागले. त्यानंतरही सासू-सुनेमध्ये वाद होत होते. १० जुलैला सत्यभामा यांना मारहाण करून सुनेने घराबाहेर काढले. सत्यभामा या मानेवाडा घाट परिसरात आल्या. त्यांनी विष प्राशन केले. हुडकेश्वर पोलिसांनी त्यांना मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना विष प्राशन केल्याबाबत विचारणा केली. सुनेने मारहाण करून घराबाहेर काढल्याचे त्यांनी डॉक्टरांना सांगितले. शनिवारी मध्यरात्री सत्यभामा यांचा मेडिकलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2019-07-29


Related Photos