सौर पंप,वीजही नसल्याने शेतकरी सिंचनापासून वंचित


- डिमांड भरूनही सौर पंप मिळेना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मुल
: शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा व्हावी, वीज जोडणीसाठी आर्थिक भूर्दंड बसू नये तसेच वीज वितरण कंपनीवर येणारा ताण लक्षात घेता राज्यशासनाने सौर कृषीपंप योजना सुरू केली. या योजनेला शेतकऱ्यांनी  मोठा  प्रतिसाद दिला.  मात्र तालूक्यातील काही शेतकऱ्यांनी  अर्ज तसेच डिमांड भरूनही सौर कृषी संचच दिल्या जात नसल्यामूळे शेतकऱ्यांमध्ये  नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे,महावितरण कंपनीचे अधिकारी,कर्मचारी समाधानकारक उत्तर देत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
 या योजनेनुसार कृषी पंपासोबत दोन एलईडी कृषी बल्ब, एक डिसी पंखा, व एक मोबाईल चार्जिग साॅकेट देण्याचा निर्णय शासनाने घेतला. शेतकऱ्यांनी  सिंचनाची सुविधा होईल,या आशेने मोठ्या प्रमाणात अर्ज सादर केले. काहींना डिमांड भरण्याचे पत्र आले. त्यांनतर डिमांडही भरण्यात आली. प्रथम बोअरवेलसाठी शेतकऱ्यांनी पैसा खर्च केला. त्यानंतर डिमांड भरली. आतातरी सौर पंप शेतात लागेल आणि सिंचणाची सुविधा होईल,अशी शेतकऱ्यांची  आशा होती. मात्र,ती फोल ठरली आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी वीज कंपनीच्या कार्यालयात विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे दिल्या जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी  केला आहे. त्यामुळे आता न्याय कुणाला मागायचा,असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-07-29


Related Photos