पक्षात लोकं राहण्यास का तयार नाहीत यावर शरद पवार यांनी आत्मपरीक्षण करावे : मुख्यमंत्री


वृत्तसंस्था / मुंबई :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. विरोधी पक्षातील आमदारांना ईडीच्या कारवाईची धमकी स्वत: मुख्यमंत्री फोन करून देत असून पक्षांतर करण्यासाठी धमकावत असल्याचे पवारांनी म्हटलं आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पक्षात लोकं राहण्यास का तयार नाहीत याचे आत्मपरीक्षण शरद पवार यांनी करावे असे मुख्यमंत्री म्हणाले.पक्षात राहण्यास लोकं का तयार नसल्याचे पवारांनी आत्मपरीक्षण करावे असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील अनेक नेते भाजपात येण्यास इच्छूक असून आम्ही काही नेत्यांना घेणार आहेत.ज्यांची चौकशी सुरू असेल अशा लोकांना आम्ही घेणार नसल्याचे स्पष्ट केले. भाजपा पक्ष कुणाच्या मागे धावेल अशी आमच्यावर वेळ आली नसल्याचे म्हटलं आहे. साखर कारखाने अडचणीत असताना भाजपाने अनेकांना मदत केली आहे. त्यामुळे आम्ही कोणावर दाबव टाकत नसून दबावाची गरज नसल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-07-28


Related Photos