सागवान तस्करीवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र, तेलंगाणा व छत्तीसगड राज्याच्या वनविभागाने कसली कंबर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / सिरोंचा :
सागवान तस्करीवर आळा घालण्यासाठी  महाराष्ट्र, तेलंगाणा व छत्तीसगड राज्याच्या वनविभागाने कंबर कसली असून याबाबत तीन राज्याच्या वनाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक सिरोंचा येथे पार पडली.  बैठकीला छत्तीसगड, तेलंगाणा व सिरोंचा वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.
उपवनसंरक्षक सुमित कुमार, उपविभागीय वनाधिकारी एस. एस. गाजलवार यांच्या मार्गदर्शनाखाली व आसरअल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सी. एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वनतस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र, तेलंगाणा व छत्तीसगड राज्याची संयुत्त बैठक घेण्यात आली.  सागवान लाकडाची तोड करून अवैधरित्या तेलंगाणा  राज्यातील भोपालपल्ली येथे विक्री होते. सागवान तस्करी अधिक प्रमाणात सिरोंचा वनविभाग व बिजापूर वनविभाग(छत्तीसगड) याठिकाणी होते. या  तस्करीवर आळा घालण्याबाबत चर्चा करण्यात आली. सभेमध्ये सागवान तस्करीवर आळा घालण्यासाठी आंतरराज्यीय एकत्रित गस्त करणे, अवैध वृक्षतोडीबाबत गुप्त माहिती कळविणे, संवेदनशिल  भागामध्ये अतिरिक्त वनोपज तपासणी नाके व संरक्षण कॅम्प उभारण्याबाबत उपाययोजना करण्याबाबत सुचविण्यात आले. बैठकीला बिजापूरचे(छत्तीसगड) उपवनसंरक्षक गुरूनाथन, भोपालपल्लीचे उपवनसंरक्षक प्रदिप शेट्टे, इंद्रावती टायगर रिझर्वचे उपवनसंरक्षक विष्क राज, भामरागड वनविभागाचे उपवनसंरक्षक सावरकर, भोपालपल्लीच्या डीएफओ लवानिया उपस्थित होते.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-28


Related Photos