महत्वाच्या बातम्या

 क्रिकेट पिचवर माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांची तुफान फटकेबाजी


- कुमरगुडा येथे क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / भामरागड : सतत जनतेच्या संपर्कात राहून राजकीय मैदान गाजवणारे माजी जि.प. अध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठचे विद्यमान सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी क्रिकेटच्या मैदानात तुफान फटकेबाजी केली. आदिवासीबहुल भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्यात क्रिकेटच्या मैदानात भाग्यश्री आत्राम उतरले. यावेळी समोर कोण गोलंदाज आहे ? हे न पाहता चौकार, षटकार मारले.

भामरागड तालुक्यात टेकला ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट अतिदुर्गम कुमरगुडा येथे नवयुवक क्रीडा मंडळ द्वारा आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेचे १० डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आश्रम यांनी क्रिकेट पिचवर तुफान फटकेबाजी करून युवा वर्गात उत्साह निर्माण केले.

दरम्यान गावात आगमन होताच गावकऱ्यांनी भाग्यश्री यांचा जल्लोषात स्वागत केले. या स्पर्धेसाठी दुर्गम भागातील खेळाडूंनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. कुमरगुडा येथे आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते करण्यात आले. उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भामरागड तालुका अध्यक्ष रमेश मारगोनवार, सरपंच काजल धुर्वा, दाऊ मडावी, बोदी पुंगाटी, गोंगलु लेकामी, पदमा मेंगनवार आदी मान्यवर उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos