आधारद्वारे रस्त्यावरील अनाथ बालकेही येणार रेकॉर्डवर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मुल :
  प्रत्येक बालकाला ओळख, नाव आणि राष्ट्रीयत्वाचा अधिकार असून  बालकाना त्यांची विशिष्ट ओळख असल्यास रस्त्यावर आढळून येणाऱ्या बालकांसोबतच विविध  बालगृहांमधील बालकांचे संगोपण, निरीक्षण, नियंत्रण सोयीस्कर होण्यासाठी मदत होऊ शकते, त्यामुळे राज्यभरातील अनाथ बालकांसह, विविध कारणांनी  बालगृहात दाखल झालेल्या मुलांचे आधार तयार करून त्यांना रेकॉर्डवर आणण्याचा प्रयत्न असून यासंदर्भात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडे  (यूआयडीएआय) आयोगाने प्रस्ताव सादर केल्याची माहिती राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे यांनी दिली.

भीक देणारेही गुन्हेगारच  बालहक्क आयोगासमोर रस्त्यावरीर भीक मागणाऱ्या मुलांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान आहे. अनेकदा मुलांचे पालकच त्यांना भीक मागण्यासाठी  प्रवृत्त करतात. बाल कल्याण समितीने त्यांना बालगृहात नेल्यास पालकांडून तसेच मानवाधिकार संघटनांकडून विरोध केला जातो. त्यामुळे असे प्रश्न  विचारपूर्वक आणि जनजागृतीतून सूटने आवश्यक आहे. भिक्षा प्रतिबंधक कायद्यानुसार भीक मागणाºयाइतकाच भीक देणारा आणि भिक मागण्यास प्रवृत्त  करणाराही गुन्हेगार असतो. ही बाब पालकांच्या लक्षात आणून देत कारावाई करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. 

  Print

News - Chandrapur | Posted : 2019-07-28

Related Photos