गट्टा परीसरात उदमांजराची शिकार करणारी टोळी साहित्यासह जेरबंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली : 
उदमांजराची शिकार करणाऱ्या ११ जणांच्या टोळीला  मुलचेरा पोलीसांनी अटक केली आहे. सदर प्रकरण एफडीसीएमकडे सोपविण्यात आले आहे. 
मुलचेरा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरिक्षक मिलींद पाठक यांच्या नेतृत्वातील पथक २५ जुलै रोजी सकाळी गट्टा परीसरात नक्षल शोधमोहिम राबवुन परत येत होते.   गट्टा- मुलचेरा मार्गादरम्यान सात दुचाकींवर बसलेले इसम संशयास्पद स्थितीत आढळुन आले. त्यांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे थैलीत उदमांजर, दोन भरमार बंदुका, चाकु, टार्च, सुरा आदी शिकारीचे साहित्य आढळुन आले. पोलीसांनी त्यांची चौकशी केली असता, त्यांचा नक्षल्यांशी कोणताही संबंध आढळुन आला नाही. त्यामुळे सदर प्रकरण एफडीसीएम कार्यालय मुलचेरा यांच्याकडे हस्तांतरीत केले. एफडीसीएमच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा त्यांची चौकशी करुन १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये शामराव गोंगलु कोलामी(२९), उमाजी रामजी कुमरे(३५), रामदास शामराव नरोटे(३१), दिवाकर तोंदे तुमरेटी(३०), गुरुदास जगडू जेट्टी(२३), संजय शिवराम तिम्मा(२०), अनिल ऋषी पदा(२५), रमेश केये पदा, संतोष कोमटी तुमरेटी(३२), प्रमोद रैनु कोडापे(३५), गिरीधर मंगरु उसेंडी(३०), करवे डुंगा कोलामी अशी आरोपींची नावे आहेत. यातील ११ जणांना अटक करण्यात आली आहे.
यातील करवे हा आरोपी फरार आहे. उदमांजर हा प्राणी टाईप २ मध्ये येते. या सर्व आरोपींना शुक्रवारी चामोर्शी न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-27


Related Photos