महत्वाच्या बातम्या

 ना. धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन


ना. धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : समाज कल्याण विभाग, गडचिरोली यांच्या अंतर्गत असलेल्या  भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह इमारतीचे भूमिपूजन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आमदार कृष्णा गजबे, आमदार देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय मीना, सहाय्यक आयुक्त  सचिन मडावी, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, लीलाधर भरडकर तसेच इतर वसतिगृहाचे विद्यार्थिनी व इतर मान्यवर उपस्थित होते.

समाज कल्याण विभागाचे जिल्ह्यात १० वस्तीगृह निवासी शाळा असून त्यापैकी ८ शासकीय इमारतीमध्ये आहे. आता या वसतिगृहाचे भूमिपूजन झाल्याने पुढील  वर्षभरात विद्यार्थिनी नवीन इमारतीत राहू शकणार आहे. गडचिरोली सारख्या दुर्गम भागातून येणाऱ्या विद्यार्थिनी साठी खूप मोठी सोय होणार आहे. कामाची गुणवत्ता आणि इमारत बांधकाम चांगल्या दर्जाचे करावे, अशा सूचना बांधकाम विभागास  दिले.

यावेळी  बहुजन कल्याण विभागामार्फत NEET, JEE ची तय्यारी करणाऱ्या मुला मुलींना मोफत शैक्षणिक टॅब, ६ GB डाटा असे साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी ना. आत्राम म्हणाले, मुला-मुलींनी टॅबचा चांगला वापर करुन खूप काही याच्यातून शिकता येईल, तसेच येणाऱ्या काळात प्रत्येक जिल्हयात नवीन वस्तीगृह बांधण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos