धानोरा तालुक्यात नक्षल्यांची बॅनरबाजी, २८ जुलै ते ३ ऑगस्ट पर्यंत बंदचे केले आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
उद्या २८ जुलै पासून ३ ऑगस्ट पर्यंत नक्षल्यांनी बंदचे आवाहन केले असून धानोरा तालुक्यात अनेक ठिकाणी बॅनर बांधले आहेत.
धानोरा तालुका मुख्यालयापासून ३ किमी अंतरावर असलेल्या सालेभट्टी, वडगाव, जपतलाई येथे नक्षल्यांचे बॅनर आढळून आले आहेत. नक्षल्यांनी चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षल्यांच्या स्मरणार्थ बंदचे आवाहन केले आहे. बंदमध्ये नागरीकांनी सहभागी व्हावे, असे बॅनरवर नमुद केले आहे. सरकारविरोधी मजकूर लिहिण्यात आला आहे. बॅनरबाजीमुळे ग्रामीण भागातील बससेवा बंद करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-27


Related Photos