२७ व २८ जुलै रोजी विशेष मतदार नोंदणी कार्यक्रम आयोजित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया :
भारतीय निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निवडणूक २०१९ करीता विशेष पुन:निरिक्षण कार्यक्रमांतर्गत १ जानेवारी २०१९ रोजी १८ वर्ष पूर्ण केलेल्या नागरीकांना तथा इतर वंचित घटक ज्यांची मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही अशा नगरीकांच्या नोंदणीसाठी दिनांक २७ व २८ जुलै (शनिवार व रविवार) रोजी  विशेष मतदार नोंदणी कार्यक्रम आयोजित केला आहे. सदर कार्यक्रम जिल्हयातील सर्व मतदान केंद्रावर विशेष मोहिमेंतर्गत पात्र नागरीकांना ज्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट झाले नाही अशा मतदारांना आपले नाव मतदार यादीत नोंदविता येईल. सदर मोहिमेंतर्गत मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना ६ अर्ज, मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अनिवासी मतदाराने नमुना ६ अ अर्ज, मतदार यादीतील नावात आक्षेप घेण्यासाठी किंवा नाव वगळण्यासाठी नमुना ७ अर्ज, मतदार यादीतील नोंदीच्या तपशीलामध्ये करावयाच्या दुरुस्तीसाठी नमुना ८ अर्ज अथवा मतदार यादीतील नोंदीचे स्थानांतर करण्यासाठी नमुना ८ अ अर्ज सादर करता येईल. सर्व अर्जाचे नमुने संबंधित मतदान केंद्रांवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. 
दिनांक १ जानेवारी २०१९ या आर्हता दिनांकावर आधारीत प्रसिध्द अंतिम मतदार यादीत नाव नसलेल्या सर्व पात्र नागरीकांनी विशेष  मतदार नोंदणी मोहिमेदरम्यान आपल्या नजीकच्या मतदान केंद्रावर जावून आपले नाव मतदार यादीत नोंदवावे. तसेच जांच्याकडे मतदान ओळखपत्र आहे, त्यांनीही  आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करुन घ्यावी. मतदार यादीत नाव नसल्यास या मोहिम कालावधीत मतदार यादीत नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
  Print


News - Gondia | Posted : 2019-07-26


Related Photos