सिरोंचा निवासी शाळेतील विद्यार्थींनीनी शाळेत परतावे


- सहाय्यक आयुक्तांचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : सिरोंचा येथील अनुसूचित जाती मुलींच्या शासकीय निवासी शाळेत भोजन पुरवठ्यामध्ये अळ्या आढळल्याबाबत तसेच महिला अधिक्षकाची नेमणूक न केल्याने विद्यार्थींनीनी शाळा सोडली होती. याबाबत माध्यमांमध्ये बातमी प्रकाशित होताच अधीक्षिकेची नियुक्ती करण्यात आली तसेच भोजन कंत्राटदार बदलविण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थिनींनी शाळेत परतण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शाळेतील भोजन पुरवठा कंत्राटदार बदलण्यात आला आहे. तसेच महिला अधिक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे शाळा सोडुन घरी गेलेल्या बऱ्याच विद्यार्थींनी परत शाळेत हजर झाल्या. शाळा नियमित सुरु करण्यात आलेली आहे. उर्वरित प्रवेशित विद्यार्थीनींनी लवकरात लवकर शाळेत हजर व्हावे, असे आवाहन समाज कल्याण च्या सहाय्यक आयुक्तांनी तसेच निवासी शाळेच्या मुख्याध्यापकांनी केले आहे.
News - Gadchiroli | Posted : 2019-07-26