प्रकाश सा.पोरेड्डीवार यांनी समाजव्यवस्थेत कौटूंबिक जिव्हाळा निर्माण करण्याचे कार्य केले : अरविंद सावकार पोरेड्डीवार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी /  आरमोरी :
इंद्रधनुष्याचे जसे  सात रंग असतात आणि हे सातही  रंग एकमेकांपासुन कधीही वेगळे  होऊ शकत नाही.या सातही रंगापासुन निर्माण होणारा इंद्रधनुष्य ज्याप्रमाणे आकाशामध्ये  पावसाळ्यानंतर चमकतो, अशा प्रकारचे व्यक्तीमत्व म्हणजे प्रकाश सा.पोरेड्डीवार होत. त्यांनी समाजव्यवस्थेत कौटूंबिक जिव्हाळा  निर्माण करण्याचे कार्य केले, असे प्रतिपादन सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी केले.
नागरी सहकारी बँक  गडचिरोलीचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांच्या  वाढदिवसाप्रित्यर्थ आरमोरी येथील प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांच्या प्रांगणात आ. कृष्णा गजबे यांच्या ‘विकासपर्व’ या पुस्तीकेचे विमोचन कार्यक्रमात अध्यक्षीय स्थानावरुन ते बोलत होते. कार्यक्रमाला आ. कृष्णा गजबे
,सत्कारमुर्ती प्रकाश सावकार  पोरेड्डीवार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित सावकार पोरेड्डीवार, नगराध्यक्ष पवन नारनवरे, देसाईगंजच्या नगराध्यक्षा शालुताई दंडवते, उपाध्यक्ष  मोतीलाल कुकरेजा, जि.प. सदस्य भाग्यवान टेकाम, जि.प. सदस्य संपत आडे, आरमोरी न.प.चे आरोग्य सभापती भारत बावनथडे, महीला व बालकल्याण सभापती सुनिता चांदेवार, पाणीपुरवठा सभापती विलास पारधी, जि.प. सदस्य रमाकांत ठेंगरी, अविनाश भांडेकर, भाजपाचे जिल्हा सचिव सदानंद कुथे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती खिरसागर नाकाडे, उपसभापती ईश्वर  पासेवार, भाजपा तालुकाध्यक्ष नंदु
पेट्टेवार, बँकेचे संचालक खेमचंद्र  डोंगरवार, भाजपाचे अरुण हरडे, प्राचार्य तेजराव बोरकर, नरेंद्र भरडकर, नगरसेविका गीता सेलोटकर, मिथुन मडावी,
नगरसेवीका सुनीता मरे, प्रगती नारनवरे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, ओबीसी आघाडी अध्यक्ष नंदु नाकतोडे, पं.स. सदस्य विवेक खेवले, बँकेचे संचालक डॉ. दुर्वेश भोयर, पं.स. सदस्य निता ढोरे, खरेदी- विक्री सोसायटीचे सभापती मनोज मने, डॉ. संगीता रेवतकर, राजु जेठानी, संचालक खुशाल वाघरे, भाजपाचे जि.  उपाध्यक्ष अनिल पोहनकर, मिनाक्षी गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना अरविंद सावकार  पोरेड्डीवार म्हणाले की, झाडीपट्टी रंगभुमी जिवंत ठेवण्याचे काम खऱ्या अर्थाने प्रकाश पोरेड्डीवार यांनी केले. झाडीपट्टीतील रंगभुमीचा प्रचंड इतिहास आहे. इतिहास जतन करणाऱ्या व्यक्तीमध्ये प्रकाश पोरेड्डीवार यांचे नाव अग्रक्रमी आहे. त्यांनी अठ्ठावीस वर्षाच्या प्रवासात ११०० च्या वर नाटकांमध्ये  सहभाग दाखविला. याची पावती लिम्का बुक अवार्डने मिळाली आहे. तसेच आ. कृष्णा गजबे यांनी आपल्या साडेचार वर्षाच्या कार्यकाळात समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचून समाजभिमुख कार्य केले. त्यांनी ४ वर्षात अनेक विकासकामे करुन आपल्या कार्याचा ठसा उमटविला, असे अरविंद सा. पोरेड्डीवार म्हणाले.   यावेळी आ. कृष्णा गजबे यांनी केलेल्या विकासकामाचा ‘विकासपर्व ’ पुस्तीकेचे विमोचन अरविंद सा. पोरेड्डीवार व
मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी वडसा व आरमोरी येथील सर्पमित्रांना किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन श्रीहरी कोपुलवार तर आभार नंदु पेट्टेवार यांनी मानले. कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी युगल सामृतवार, लक्ष्मण कानतोडे, गोलु वाघरे, प्रसाद साळवे, नंदु नाकतोडे,
टिंकु बोडे, गोविंदा भोयर, चंदु  आकरे, राहुल तितिरमारे, सुनील नंदनवार, गुरुदेव ढोरे, महेश बांते, खेमराज जांभुळे, स्वप्नील धात्रक, विकी आडे, मंगेश खेडकर, किशोर  गुरमवार, राजु कंकटवार , मिनाक्षी गेडाम, भाग्यवान दिवटे, हितेश कोपुलवार, आशुतोष चव्हाण, संजय सोनटक्के, होमराज जुआरे, अनंता सरसडे यासहीत प्रकाश  सावकार पोरेड्डीवार फॅन्स क्लब, युवामंच सदस्य यांनी सहकार्य केले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-26


Related Photos