अपघातात दगावलेल्या तरूण मुलाच्या म्हाताऱ्या आईला मिळाली नुकसानभरपाई


- राष्ट्रीय लोक अदालतीचा निर्णय
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी /  पवनी :
पाच वर्षापूर्वी तेलोता खैरी शिवारात अपघातात ठार झालेल्या मौजा ब्रम्ही येथील युवकाच्या म्हाताऱ्या  आईला नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालती मध्ये न्याय मिळाला असून साडे पाच लाख रुपयांची आर्थिक नुकसानभरपाई मिळाली आहे. 
मौजा ब्रम्ही येथील शेतकरी युवक नामे ललेंद्र रामदास रामटेके (२७)    हा १६  डिसेंबर २०१४ ला कोंढा कोसरा येथून पायदळ तेलोता खैरी शिवारातून जात असताना  मागेहून येणाऱ्या  ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३६ /एल ४३५१ च्या चालकाने हयगयीने व निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवून ठोस मारली व घटनास्थळावरून पळून गेला. 
या अपघातात युवा शेतकरी जागीच ठार झाला. त्यामुळे त्याच्या म्हाता-या आईने शारदाबाईने भंडारा जिल्हा मोटार वाहन अपघात प्राधिकरणाकडे आर्थिक नुकसानभरपाई मिळण्यासाठी ॲड. महेंद्र गोस्वामी यांच्या मार्फत अर्ज दाखल केला होता.  नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालती मध्ये ट्रॅक्टरचा चालक गोपाल उकरे, मालक दिनकर सेलोकर व ईफ्को टोकियो जनरल ईन्शुरन्स कंपनीने  अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या युवकाच्या आईला साडे पाच लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे मान्य केले. 
म्हातारी आई शारदाबाई रामदास रामटेके हिच्या आयुष्याचा सहारा तिने गमावल्यामुळे तिला आर्थिक नुकसानभरपाई देणे आवश्यक असल्याने आपसी तडजोडी द्वारे प्रकरण निपटवण्यात आले.  हे प्रकरण राष्ट्रीय लोक अदालती मध्ये आपसी तडजोडी द्वारे निपटारा करण्यासाठी अर्जदार तर्फे वकील ॲड. महेंद्र गोस्वामी व ईन्शुरन्स कंपनी तर्फे वकील ॲड. विजय दलाल यांनी प्रयत्न केले व म्हाता-या आईला न्याय मिळवून दिला.  Print


News - Bhandara | Posted : 2019-07-26


Related Photos