महत्वाच्या बातम्या

 प्रसिद्ध अभिनेते ज्युनिअर मेहमुद यांचे कर्करोगामुळे निधन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक ज्युनियर मेहमूद यांचे कर्करोगाशी लढा देऊन निधन झाले आहे. ज्युनियर महमूद स्टेज ४ पोटाच्या कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ज्युनियर महमूद यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

माहितीनुसार, शुक्रवारच्या नमाजनंतर जुहू येथील कब्रस्तानात ज्युनियर महमूद यांना जुहूच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुले, सुना आणि एक नातू असा परिवार आहे. नईम सय्यद हे ज्युनियर मेहमुद या नावाने प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९५६ रोजी झाला. 

ज्युनियर महमूद कोण होता?

ज्युनियर महमूदचे खरे नाव नईम सय्यद होते. त्याने रुपेरी पडद्यासाठी ज्युनियर मेहमूद हे नाव धारण केले. ज्युनियर मेहमूदने बाल कलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली होती. बालकलाकार म्हणून त्यांना चित्रपटांमध्ये विशेष ओळख मिळाली. बचपन, गीत गाता चाल, कटी पतंग, मेरा नाम जोकर, ब्रह्मचारी आणि इतर चित्रपटांमध्ये तो दिसला होता. त्यांच्यासोबत त्यांचा मित्र सचिन पिळगावकर हाही बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटांमध्ये दिसला होता. दोघांची जोडी चांगलीच गाजली.





  Print






News - Rajy




Related Photos