पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून ताडगावात इसमाची कुऱ्हाडीने वार करून हत्या


- आरोपी फरार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून इसमाची कुऱ्हाडीने  वार करून हत्या करण्यात आल्याची घटना तालुक्यातील ताडगाव येथे घडली आहे. जुरू बंडू आत्राम (४५) असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव असून आरोपी रामा कुडयामी हा फरार झाला आहे. सदर घटना आज २५ जुलै रोजी सकाळी ८  वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार मृतक जुरू आत्राम याचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपी रामा कुडयामी याला होता. आज सकाळी मृतक जुरू गावातीलच एका दुकानाजवळ पेपर वाचत असला होता. यावेळी रामा कुडयामी हा हातात कुऱ्हाड घेवून आला. त्याने जुरूच्या मानेवार वार केला. यामध्ये जुरू आत्राम जागीच गतप्राण झाला. आरोपी रामा फरार झाला आहे. भामरागड पोलिसांनी आरोपीविरूध्द भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास ताडगाव पोलिस मदत केंद्राचे अधिकारी करीत आहेत.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-25


Related Photos