महत्वाच्या बातम्या

 आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित उद्या भंडारा जिल्हा दौऱ्यावर 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री भंडारा जिल्हा डॉ.विजयकुमार गावित हे ८ डिसेंबर २०२३ रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

सकाळी ९.३० वाजता शासकीय विश्रामगृह भंडारा येथे आगमन व राखीव. सकाळी १०.४५ वाजता शहापूर येथील डिफेन्स सर्व्हीसेस ॲकेडमी येथे आगमन करतील व सकाळी ११ वाजता राज्याचे राज्यपाल रमेश बैस महोदयांसमवेत विकसीत भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

दुपारी १२.४५ वाजता डिफेन्स सर्व्हीसेस ॲकेडमी येथुन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण करतील व दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे अधिकाऱ्यासमवेत बैठक घेतील. त्यानंतर दुपारी ३ वाजता भंडारा येथुन नागपूरकडे प्रयाण करतील.





  Print






News - Bhandara




Related Photos