बल्लारपूर येथील बसस्थानकाच्या निकृष्ट बांधकामाविरोधात बसस्थानकातच राजु झोडे यांचे धरणे आंदोलन


-  बांधकामाची  चौकशी करुन ठेकेदार व भ्रष्ट अधिकारी यांचेवर कारवाई करण्याची राजु झोडे यांची मागणी 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : 
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील व ईतर ठिकाणी मागिल चार वर्षात झालेले सिमेंट कांक्रेट चे रस्ते ,स्मशानभुमी तसेच बल्लारपूर येथिल स्वागत गेट व बसस्थानकाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्याचप्रमाणे चंद्रपूर येथिल प्रियदर्शनी सभागृहाचेही बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असुन त्याची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी राजु झोडे  यांनी केली असून बल्लारपूर बसस्थानकावर   धरणे आंदोलन केले. 
    मागिल चार वर्षात बांधलेल्या सिमेंट रोडवर अनेक ठिकाणी गिट्टी निघाली असुन मोठे गड्डे पडले आहेत. तसेच बल्लारपूर येथिल बसस्थानकाचे वारंवार छत कोसळत आहे . त्यामध्येही मोठा भ्रष्टाचार झाला असुन बांधकाम अत्यंत निक्रुष्ठ झाले आहे. बसस्थानकाचे छत पुन्हा कोसळुन केव्हाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बल्लारपूर शहरातील स्वागत गेट ,स्मशानभुमी, प्रियदर्शनी सभाग्रुह यामध्येही दोषपुर्ण बांधकाम झाल्याचे आढळते.
     वरिल सर्व बांधकामात करोडो चा भ्रष्टाचार झाल्याचे आढळत आहे .वरिल बांधकामाची चौकशी करण्यात यावी याकरिता बल्लारपूर बसस्थानकातच राजु झोडे यांच्या नेतृत्वात तिव्र धरणे आंदोलन करण्यात आले.जोरदार घोषणाबाजी करत शासन व प्रशासनाच्या दिरंगाईचा विरोध या धरणे आंदोलनात करण्यात आला.
  सर्व बांधकामाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करावी व दोषी अधिकारी व कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी   राजु झोडे  यांनी केली. जर चौकशी करुन कारवाई केली नाही तर  याहीपेक्षा तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा  राजु झोडे  यांनी दिला. निवेदन देतांना राजु झोडे ,वंदनाताई तामगाडगे,सुमित्रा कुचनकर,नंदाताई पंदिलवार,संपत कोरडे,मनोज बेले ,सचिन पावडे,लक्ष्मण निषाद,गुरु कामटे,राजु काटम,मुकिम सिद्दिकी, पंचलिश तामगाडगे तथा अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-07-25


Related Photos