जिल्हा कोषागार कार्यालय भंडारा येथील वरीष्ठ लिपीक एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा :
पदोन्नती साखळीतील वरच्या पदाची वरीष्ठ वेतन श्रेणी लागू झाल्यानंतर थकबाकी व सहाव्या वेतन आयोगाचे प्रलंबित असलेले पाच हप्त्याची ११  लाख ६३  हजार ४९०  रूपयांच्या रक्कमेचे बिल तपासून वरीष्ठांकडे मंजूरीसाठी पाठविण्यासाठी व बिल काढून देण्यासाठी पाच हजारांची लाच घेणारा जिल्हा कोषागार कार्यालयातील लिपीक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.
प्रकाश ईसराम पटले (४९)  असे लाचखोर वरीष्ठ लिपीकाचे नाव आहे.  तक्रारदाराच्या सेवाकाळातील १ ऑगस्ट  २००८  पासून आश्वासीत प्रगती योजनेचा पहिला लाभ पदोन्नती साखळीतील वरच्या पदाची वरीष्ठ वेतन श्रेणी लागू झाल्यानंतर थकबाकी व सहाव्या वेतन आयोगाचे प्रलंबित असलेले पाच हप्त्याची ११ लाख ६३  हजार ४९०  रूपयांच्या रक्कमेचे बिल काढण्यासाठी प्रकाश पटले यांच्याकडे संपर्क साधला होता. यावेळी पटले यांनी सदर कामासाठी पाच हजारांची लाच मागितली. दरम्यान आज २४  जुलै रोजी सापळा रचून कारवाई करण्यात आली. भंडारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   Print


News - Bhandara | Posted : 2019-07-24


Related Photos