मुलचेरा पंचायत समितीचा शिक्षण विभाग रामभरोसे, गटशिक्षणाधिकारी प्रभारी


-  तालुक्यात ४ केंद्रप्रमुखापैकी ३ प्रभारी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मुलचेरा :
पंचायत समितीच्या शिक्षण विभागात गटशिक्षण अधिकाऱ्यांसह   समुह साधन केंद्रातील केंद्रप्रमुखांची पदे रिक्त असल्याने याचा परिणाम  प्रशासकीय कामकाजावर होत आहे. यामुळे शिक्षण विभाग रामभरोसे असल्याचे बोलल्या जात आहे. 
शिक्षण विभाग कार्यालयात २०१७ पासून गटशिक्षण अधिकाऱ्याचे पद रिक्त असुन २०१७ - १८ मध्ये सुद्धा मेश्राम  हे  प्रभारी गटशिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत होते. २०१८ - १९ पासून पदाचा प्रभार पंचायत समिती चामोर्शी येथील विस्तार अधिकारी अलोने यांच्याकडे सोपविण्यात आला.
मुलचेरा शिक्षण विभागाचा  प्रभार  असल्यामुळे पुर्ण वेळ देऊ शकत नसल्याने शिक्षण विभागाची  कामे खोळंबली आहेत.  तालुक्यातील शिक्षकांची  कामे लांबणीवर जात आहे. यामुळे कायमस्वरूपी गटशिक्षण अधिकारी देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. 
 मुलचेरा तालुक्यात  मुलचेरा, सुंदरनगर,गांधीनगर आणि लगाम असे चार समूह साधन केंद्र आहेत. तीन केंद्राचा कार्यभार  प्रभारी केंद्रप्रमुखांच्या  भरोश्यावर आहे.  तर केवळ  लगाम केंद्रात कायमस्वरूपी  केंद्रप्रमुख आहे.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा देशबंधुग्राम येथील पदवीधर शिक्षक सुकेन मुजुमदार  हे प्रभारी  केंद्रप्रमुख मुलचेरा, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मल्लेरा येथील पदवीधर शिक्षक कोंडावार हे  प्रभारी  केंद्रप्रमुख गाधीनगर, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आंबटपल्ली  येथील  पदवीधर शिक्षक महेश मुक्कावार  हे प्रभारी  केंद्रप्रमुख सुंदरनगर येथे कार्यरत आहेत.   समूह साधन केंद्र लगाम येथे  भाणारकर हे  केंद्रप्रमुख आहेत.
पदवीधर शिक्षकांवर केंद्रप्रमुखाचा भार असल्यामुळे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत आहे.  या सर्व बाबींचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असतो.  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने इतक्या मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असणे विद्यार्थी हिताच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे  सर्व रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी.  मुलचेरा केंद्रातील केंद्रप्रमुखाचा प्रभार सेवा जेष्टतेनुसार देण्यात आलेले नाही यामुळे शिक्षक वृंदात नाराजी  आहे. या प्रश्नावर तोडगा काढावा अशी मागणी होत आहे. 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-24


Related Photos