पुलवामा हल्ल्यामागे ‘जैश-ए’मोहम्मद या दहशतवादी संघटनेचाच हात : इमरान यांची कबुली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / न्यूयॉर्क :
पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी देशात दहशतवादी संघटना सक्रिय असल्याचे स्वीकार केले असून पुलवामा हल्ल्यामागे जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचाच हात असल्याची कबुली दिली आहे. त्याचबरोबर फक्त पाकिस्तानमध्येच नाही तर कश्मीरमध्येही जैश ए मोहम्मद सक्रिय असल्याचा त्यांनी दावा केला आहे. अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या इमरान खान यांनी एका मुलाखतीत ही कबुली दिली आहे. त्यांच्या या कबुलीमुळे पुलवामा हल्यामागे जैश ए मोहमद्द असल्याचा हिंदुस्थानच्या दाव्याला बळकटीच मिळाली आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानमध्ये जैश ए मोहम्मद सक्रिय असल्याचा हिंदुस्थानचा दावा पाकिस्तानने खोडून काढला होता. पण खान यांनी केलेल्या टिप्पणीमुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतही पाकिस्तानला साथ देत चीनने मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यास विरोध दर्शवला होता. याच वर्षी १४ फेब्रुवारी रोजी जम्मू-कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला झाला होता. यात ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटले. पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली होती. या हल्ल्यामागे पाकिस्तानमधील जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटना असल्याचे पुरावेही हिंदुस्थानने पाकिस्तानला दिले. पण पाकिस्तानने या हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले. त्यानंतर हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून बालाकोट येथील दहशतवाद्याचे अड्डेच उडवले. या हल्ल्यानंतर दोन्ही देशातले संबंध अधिकच ताणले गेले आहेत.
दरम्यान, या मुलाखतीत इमरान खान यांना ९/११ च्या हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले. तसेच पाकिस्तानमद्ये ४० दहशतवादी संघटना सक्रिय असल्याचा गौप्यस्फोट करत खळबळ उडवली आहे. त्याचबरोबर पाकिस्तानच्या आधीच्या सरकारने अमेरिकेला दहशताद्यांशी संबंधित योग्य माहिती पुरवली नाही असेही म्हटले आहे.  Print


News - World | Posted : 2019-07-24


Related Photos