लहान मुलीच्या हत्येची शिक्षा भोगून आलेल्या नराधम बाप्पाने १५ वर्षांच्या सख्ख्या मुलीवर केला अत्याचार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  वाशीम :
लहान मुलीच्या हत्ये प्रकरणी सात वर्षांचा कारावास भोगून आलेल्या नराधम बापाने आपल्याच १५ वर्षांच्या सख्ख्या मुलीवर सातत्याने शारीरिक अत्याचार केल्याची   नात्याला काळिमा फासणारी  घटना वाशीम जिल्हय़ात उघडकीस आली आहे. या प्रकारणी पीडित मुलीने वाशीम ग्रामीण पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीवरून आरोपी बापाविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
वाशीम तालुक्यातील रहिवासी १५ वर्षीय पीडित मुलीच्या आईचे तिच्या लहानपणीच निधन झाले होते. बापाने सख्ख्या लहान मुलीची हत्या केल्याच्या गुन्ह्यात तो सात वर्षे अमरावती व वाशीमच्या कारागृहात बंदिस्त होता. या दरम्यान पीडित मुलगी आजोबा व आजी यांच्याजवळ राहत होती. दोन महिन्यापूर्वी पीडितेचा बाप हा कारागृहातून सुटला. एक महिना पुणे येथे मजुरीचे काम करून तो महिन्याभरापूर्वी घरी परतला. तेव्हापासून पीडित मुलगी त्याच्याजवळ राहत होती. यादरम्यान नराधम बाप आपल्याच सख्ख्या मुलीवर जबरदस्ती करून अत्याचार करीत होता. अनेकवेळा तिला विशिष्ट प्रकारच्या गोळ्या प्राशन करण्यास भाग पाडले. रविवारी रात्री तो पीडित मुलीला दुचाकीवर बसवून आत्याच्या घरी नेण्याच्या बहाण्याने घेऊन जात असताना आजी-आजोबांसह काका आदींनी त्यास प्रतिकार करून मुलीची सुटका केली. याप्रकरणी पीडित मुलीने वाशीम ग्रामीण पोलिसांत बापाविरुद्ध तक्रार दाखल केली.  Print


News - Rajy | Posted : 2019-07-24


Related Photos