महत्वाच्या बातम्या

 राज्यव्यापी वंध्यत्व निवारण अभियान १९ डिसेंबरपर्यंत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : पशुधनामध्ये सलग तीन आठवडे शारीरिक वजन नोंदीतून शरीरीक वजन घट दिसून येते, अशा पशुधनामध्ये प्रजननाची कमतरता आणि वंध्यत्वाची बाधा असण्याची दाट शक्यता असते. शेतकरी, पशुपालक यांच्याकडील गायी-म्हशींमध्ये असलेल्या उद्भवलेल्या वंध्यत्वाचे निवारण करण्यासाठी जिल्हयामध्ये १९ डिसेंबरपर्यंत राज्यव्यापी वंध्यत्व निवारण अभियान जिल्ह्यातील प्रत्येक गावात राबविण्यात येत आहे.

गायी, म्हशी माजावर आल्यानंतर त्यांच्यामध्ये योग्यवेळी कृत्रिम रेतन न केल्यास जनावरांच्या दोन वेतातील अंतर वाढणे, वर्षाला एक वासरु मिळणे हे उद्दिष्ट साध्य न होणे आणि जनावरांच्या खाद्यावरील खर्चात वाढ होऊन पशुपालकांचे आर्थिक नुकसान होते. पशुपालकांनी आपल्या वंधत्वग्रस्त जनवारांवर उपचार करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त मंजुषा पुंडलिक यांनी कळविले आहे.       





  Print






News - Nagpur




Related Photos