मोदुमडगु येथील अतिक्रमण काढताना अतिक्रमणधारक पोलिसाच्या पत्नीचा पोलिसांवर कुर्‍हाडीने हल्ल्याचा प्रयत्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी 
: आज २३ जुलै रोजी आलापल्ली शहरानजीक असलेल्या ग्रामपंचायत नागेपल्लीच्या हद्दीतील  मोदुमडगु येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेवर असलेले अतिक्रमण काढण्यात प्रशासनाला यश आले आहे .मात्र अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या प्रशासकीय चमू तसेच पोलिस  पथकावर  अतिक्रमणधारक एका पोलिसाच्याच पत्नीने चक्क कुर्‍हाडीने हल्ल्याचा प्रयत्न केला. यामुळे वातावरण चांगलेच तणावपूर्ण झाले होते. अतिक्रमण हटविताना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार, नागेपल्लीच्या सरपंच उपस्थित होत्या. 
मागील तीन वर्षापासून नागेपल्ली ग्रामपंचायत हद्दीत मोदुमडगु  येथे असलेल्या वनविभाग अहेरी यांच्या मालकीच्या जागेवर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे  बांधकाम सुरू होते. मात्र मोदुमडगु मध्ये असलेल्या  सुभाष मंडल नामक पोलिस कर्मचाऱ्याने त्या जागेवर अतिक्रमण केले होते. ही बाब प्राथमिक  आरोग्य केंद्राच्या  कर्मचार्‍यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्या मार्फत तसेच वनविभागामार्फत अनेकदा त्यांना नोटीस बजावली होती.  मात्र त्यांनी अतिक्रमण काढण्याची  तयारी दर्शविली नाही.  यामुळे आज पोलीस विभाग तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या  चमूने  घटनास्थळ गाठून  अतिक्रमण काढण्याचा  प्रयत्न करत असताना अतिक्रमणधारकांनी त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.  
सहायक पोलिस निरीक्षक संदीप हजारे घटनास्थळी पोहचले. साध्या वेशात, पोलीस आणि आरोग्य विभागाची संयुक्त चमू होती.   सुभाष मंडल नामक व्यक्तीच्या पत्नी आणि मुलीने सहाय्यक पोलीस निरीक्षक व महिला पोलीस कर्मचाऱ्यांना  मारहाण करण्यास सुरुवात केली.  त्यांनी कुऱ्हाड  - कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला . मात्र  प्रसंगावधान राखून  त्यांना ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला. सुभाष मंडल पोलीस विभागात सहायक फौजदार म्हणून कार्यरत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याप्रकरणी अद्याप कोणावर गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-23


Related Photos