गडचिरोली शहरात डुक्कर पकडण्याची मोहिम, डुक्कर मालकांचा नगर परिषदेत राडा


- डुक्करे नेऊ देण्यास विरोध
- नगर परिषदेच्या आवारात तगडा पोलिस बंदोबस्त
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
नगर परिषदेच्या वतीने वाशिम येथील एका कंत्राटदारास डुक्कर पकडण्याचे कंत्राट देण्यात आले. या कंत्राटदाराने दोन दिवसांपासून डूक्करे पकडण्याची मोहिम राबवित जवळपास २०० डुक्करे पकडली. मात्र डुक्कर मालकांनी नगर परिषदेमध्ये येत डुक्करे नेऊ देणार नाही, यासाठी चांगलाच राडा घातला. यामुळे नगर परिषद प्रशासनाने गडचिरोली पोलिसांना पाचारण केले. तगड्या पोलिस बंदोबस्तात डुक्कर मालकांना समजाविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र डुक्कर मालक डुक्करे नेउ देणार नाही, यावर ठाम असल्याने तणावपूर्ण वातावरण आहे.
शहरात डुकरे इतरत्र भटकत  असल्याच्या तसेच घाण पसरवित असल्याच्या तक्रारी नगर परिषदेकडे प्राप्त झाल्या होत्या. यामुळे नगर परिषदेने वाशिम जिल्ह्यातील एका कंत्राटदारास डुक्करे पकडण्याचे कंत्राट दिले. अशाच प्रकारे याआधीही डुक्करे पकडण्यात आली आहेत. डुक्कर मालकांना नगर परिषदेच्या वतीने नोटीस बजावण्यात आली होती. मात्र डुक्कर मालकांनी बंदोबस्त केला नाही. यामुळे डुक्करे पकडून वाहनात कोंबून नेण्यात येत आहे. मात्र या मोहिमेला डुक्कर मालकांनी प्रचंड विरोध दर्शविला आहे. आज २३ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास डुक्कर मालकांनी नगर परिषद गाठून डुक्करे भरलेली वाहने जावू देणार नाही अशी भूमिका घेतली. यामुळे नगर परिषद प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. पोलिस निरीक्षक चौगावकर यांनी डुक्कर मालकांना समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र डुक्कर मालक आपल्या मतावर ठाम असून डुक्करे नेवू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. यामुळे तणाव निर्माण झाला आहे. काही महिलासुध्दा उपस्थित असून डुक्करे नेल्यास आम्ही आत्मदहन करू, असाही इशारा त्यांनी दिला आहे. 
पोलिस निरीक्षक चौगावकर यांनी डुक्कर मालकांसोबत चर्चा करून शासकीय कामात अडथळा आणू नये, असे आवाहन केले. तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन केले. मात्र डुक्कर मालक आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून येत आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-23


Related Photos