अन्न व औषध प्रशासन विभागाची जप्तीची कारवाई , हुक्का शिशा तंबाखूचा साठा जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / गडचिरोली : पोलीस स्टेशन, गडचिरोली व अन्न व औषध प्रशासनास मिळालेल्या गुप्त माहिती च्या आधारे चामोर्शी मार्गावरील राधे बिल्डींग समोर वाहनाला अडवून हुक्का शिशा तंबाखूचा साठा जप्त  केला आहे. काल २२ जुलै  रोजी अन्न व औषध प्रशासन  विभागाला मिळालेल्या माहितीनुसार एमएच -३४ - ७६४६ या वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनात  हुक्का, शिशा, तंबाखूचा साठा आढळला. माझा हुक्का २०० ग्रम, २८० बॉक्स, किंमत १ लाख ४४ हजार २००  रुपये असून  वाहनाची किंमत अंदाजे १ लाख २० हजार आहे.  सदर गुन्ह्यात आरोपी वर अंतर्गत शिक्षापात्र कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस स्टेशन, गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावकर व अन्न व औषध प्रशासन विभाग, गडचिरोलीचे सहायक आयुक्त कांबळे यांच्या मार्गदर्शनात अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर, नमुना सहायक तुकाराम गोडे, सहायक फौजदार म्हशाखेत्री व नापोशी केदार यांनी पार पाडली.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-23


Related Photos