महिला, मुलींबाबात भाजप सरकार गंभीर नाही : सक्षणा सलगर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
केंद्रात व राज्यात असलेले भाजपा सरकार महिला आणि मुलींबाबत गंभीर नाही, असा आरोप राष्टवादी युवती काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी केला.
आज २३ जुलै रोजी सक्षणा सलगर ह्या गडचिरोली येथे विद्यार्थिनींशी हितगुज या राकाॅंच्या उपक्रमांतर्गत आल्या असता पत्रकार परिषदेत बोलत होत्या. पत्रकार परिषदेला रायुकाॅंचे प्रदेश अध्यक्ष महेश तपासे, जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर), राकाॅंचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, मनुषा काटे, रिंकु पापडकर, लिलाधर भरडकर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना सक्षणा सलगर म्हणाल्या, भाजपा सरकारमधील मंत्री, आमदार महिला, मुलींबाबत अनेकदा चुकीचे बोललेले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लिन चिट देण्याचे काम केले आहे. विदर्भातील मुलींसोबत संवाद साधण्यासाठी दौरा करीत असून विद्यार्थिनींकडून अनेक समस्या समोर येत आहेत. याबाबत दौरा संपताच मुख्यमंत्र्यांची भेट घेउ, अत्याचार का वाढले, महिला सुरक्षित का नाहीत हे प्रश्न उपस्थित करू, असेही सलगर म्हणाल्या. 
राकाॅं ची नाळ विद्यार्थिनींशी जुळलेली आहे. यामुळे त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर राहू, येत्या विधानसभा निवडणूकीत तरूण नेतृत्वाला संधी देण्याचे राकाॅंचे धोरण राहिल. राकाॅंचे सर्वेसर्वा शरद पवार हे सुध्दा यासाठी सकारात्मक आहेत. जास्तीत जास्त युवतींनी मागणी केल्यास विधानसभा निवडणूकीत राकाॅ संधी देईल, असेही त्या म्हणाल्या. 
रायुकाॅंचे प्रदेश अध्यक्ष महेश तपासे म्हणाले, भाजपा मनुवादी विचारांशी नाळ जुळलेला पक्ष आहे. यामुळे महिला, विद्यार्थिनींच्या प्रश्नांकडे दूर्लक्ष केले जात आहे. राकाॅं ला एकहाती सत्ता मिळाल्यास महिला विधेयक आणून राजकारणात पुरूषांप्रमाणे महिलांना समान संधी उपलब्ध करून देउ, असे ते म्हणाले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-23


Related Photos